कविता मराठी -कोरोना चा काळात(अशोक शिरोडे)
कोरोना चा काळात
(अशोक शिरोडे)
------------------------
कोरोनाच्या या काळात
लोकतरी काय करणार
हातात सेनेटाइजर तर
तोंडावर मास्क लावणार।
शाळां ना आहे सुट्टी
व्हया पुस्तकानां बंदी
घरात पोरांची धींगामस्ती
आड ओरडच राहणार
सकाळी आरामात उठतात
मनात आल तस करतात
घराबाहेर चे खेळ
खेळाचा नाही हा वेळ
पावभाजी गुपचुप भेळ
आता नाही मिळणार
शहाण बाळ हूण
मूलं घरातच राहणार
आता कोणीही
मुलानां नाही रागावनार
शिक्षकांची भीति
आता नहीं राहणार ।।
बायकांच प्रश्न आहेत मोठे
मोठी आहे त्यांची तक्रार
बंदीच्या काळात घरात राहुन
बसून बसून गेले कंटाळून
रोज चे स्वंयपाक, धुन - भांडे
मुलांचे माणसाचे रोजचे वांधे
बाजार आणि मॉल आहेत बंद
ब्यूटी पार्लर स्पा ही आहेत बंद
बायकांचे आहे अशी व्यथा
आता होत नाही गप्पा टप्पा
शेजारची मावशी काकू येत नाही
सासु सुनेचे गा-हाणे होत नाही
लॉक डाउन च्या काळात
कामगारानां मिळाली आहे सुट्टी
फक्त त्यांचीच आहे रोजची ड्यूटी
आठवड्यात एका दिवसाचा
बायकानां ही अवकाशध्या
लॉक डाउन चा आनंद
त्यांना ही घेऊ ध्या
मग कोणती ही तक्रार
तुमच्याशी नाही करणार ।।
कोरोनाच्या या काळात
लोकतरी काय करणार
हातात सेनेटाइजर तर
तोंडावर मास्क लावणार ।।
Comments
Post a Comment