मराठी कविता : तरुण बदलतात जगाला

तरुण बदलतात जगाला
------------------------------

तरुणानां
काळा सोबत चालू द्या
आपल्या भोवती
आपणच मांडलेली
कुंद करणारी
सीमा/बंधन
सहर्ष तोडून
नव-शक्ति ला
समाज/विचार
परिवर्तन करू द्या

आपण थांबलो
आपापल्या वर्तुळात
जग
वा-याच्या वेगाने
बदलत असतं
तरुण
वेळाच्या गति ने
वेळा सोबत
धावतात

इतिहास दाखवतो
क्रांति तरूणच करतात
उन्नति चे
नवीन संकल्पना
नवे विचार नवी दिशा
नवे लक्ष्य
सतत शोधतात
सफलते चे
कीर्तिमान रचतात
आणि बदलतात                                  समाज आणि  जगाला ।।

-----------------------
अशोक शिरोडे

Comments

Popular posts from this blog

संविधान की प्रस्तावना :

परसाई की रचनाएं "सोचना" और "सवाल करना" सिखाती है (डॉ.अशोक शिरोडे)

डॉ. प्रकाश व डॉ मंदाकिनी आमटे