मराठी कविता -माणसा

अरे माणसा तू आहे असा कसा ।

जगासाठी अन्न तूच उगवितो
घामाने अंग भिजवितो
सकाळ संध्या काळ पाहत नही
कष्ट केल्या शिवाय राहत नाही
तरी अन्न तुलाच मिळत नाही ।

काबाड़ कष्ट करून जगतो
प्रामाणिक पणे सर्वांशी वागतो
श्रमाला तुझ्या कीमत नाही

तुझ्याच पेरलेल्या पिकावर
त्यांचा बाजार असतो
तुझा भोलेपणा तुलाच नडतो
तुला हे का कळत नाही ।

दुनिया आता बदलली आहे
आपुलकी चे धड़े विसरली आहे
श्रमाला सोडून माणुसकी तोडून
छळ बळा वर चालली आहे,
त्यांच्या इतकी तुझी धाव नाही
त्यांना मुळीच तुझी चाव नाही

तरी पण त्यांच्यावर

तू का विश्वास ठेवतो

तुझा भोलेपणा तुलाच नडतो

तुला हे का कळत नाही  ।।


आपल्या हक्कासाठी
आपल्या पोटा साठी
उठ उभा हो मुट्ठी बांध
आम्ही तुमचे गुलाम नाही
हक्क पाहिजे भीख नाही
असे अवार्जुन सांग
हक्क हिस्कावा लागतो
मगितल्याने मिळत नाही ।।
तुला हे का कळत नाही

Comments

Popular posts from this blog

संविधान की प्रस्तावना :

परसाई की रचनाएं "सोचना" और "सवाल करना" सिखाती है (डॉ.अशोक शिरोडे)

डॉ. प्रकाश व डॉ मंदाकिनी आमटे